महादंन्डनायक भगवान वीर एकलव्य जयंतीनिमित्त साक्रीत विनम्र अभिवादन !
साक्री (प्रतिनिधी) आज रोजी महाशिवरात्री तसेच भगवान वीर एकलव्य जयंतीनिमित्त साक्री येथे मुख्य बाजार पेठ येथे भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक उज्वला भोसले (नगरसेविका प्रभाग क्रमांक ११), जयश्री पगारिया (नगरसेविका प्रभाग क्रमांक १२) यांनी केले.
यावेळी जयश्री पवार (नगरअध्यक्ष साक्री नगरपंचायत), बापुसाहेब गीते (उपनगराध्यक्ष साक्री नगरपंचायत), विलास बिरारीस, शैलेश आजगे (भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस), रेखा सोनवणे, उषा पवार, पूनम काकूस्ते, आबा सोनवणे, विजय भोसले, अनिल पवार, जगदीश शिंदे, महेंद्र देसले, कल्याण भोसले, रंगनाथ भवरे, गणेश सूर्यवंशी, सुरेश सोनवणे, दशरथ भवरे, रामचंद्र शेठ, राहुल बागुल, गोपा ठाकरे, अनिल मोरे, योगेश भामरे तसेच नगरसेविका, नगरसेवक तसेच सर्व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.