महाराष्ट्र
विज्ञान दिनाचे औचित्य साधून भव्य शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीचे आयोजन
नांदेड (जावेद अहमद) विज्ञान दिनाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी ज्युनियर बेसिक स्कूल सगरोळी येथे भव्य शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीत 120 विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेत 75 पेक्षाही अधिक शैक्षणिक साहित्यांची निर्मिती केली.
विद्यार्थ्यानी कल्पकतेने बनविलेल्या शैक्षणिक साहित्यांची मांडणी करण्यासाठी प्रत्येक विषयांचे स्वतंत्र दालन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उदघाटन प्राध्यापक साईनाथ गंगाधरराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. इतर पालकांनीही या प्रदर्शनीचे अवलोकन केले. याचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.