महाराष्ट्रराजकीय
साक्री तालुक्यातील जानकाई नर्सरी ते दारखेल गावापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यात यावा ; काँग्रेसची मागणी
साक्री (प्रतिनिधी) तालुक्यातील कासारे गावापासुन जानकाई नर्सरी ते दारखेल गावापर्यंत ६कि.मी. रस्ता डांबरीकरण करण्यात यावा तसेच साक्री तालुक्यातील इतर प्रश्न मार्गी लावावे या विषयाचे निवेदन अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्टे यांच्याव्दारे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा सहकार समन्वयक बापुसाहेब उत्तमराव देसले, धुळे जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत भामरे, साक्री तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष कपिल जाधव आदी उपस्थित होते.