जाबुंळधाबा येथील थरारक घटना जळते लाकुड बायकोच्या डोक्यात टाकुन हत्या
मोताळा (मिलींद बोदडे) मलकापुर तालुक्यातील जाबुंळधाबा येथे शुल्लक कारणावुन नवऱ्याने रागाच्या भरात जळते लाकुड टाकुन बायकोची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी विक्रम उर्फ भुषण धनराज बाविस्कर (वय २३ वर्ष रा. जाबुंळधाबा) याने दिलेल्या फिर्यादी वरुन आई वडिलांचे नेहमी शुल्लक कारणावरून खटके उडायचे. फिर्यादीचे वडील तथा धनराज माणिकराव बाविस्कर (वय ५० वर्ष रा जाबुंळधाबा ता मलकापुर) यांनी ३१/१/२०२२ रोजी च्या सकाळी ७ ते ९ वाजेच्या दरम्यान आई संगीता धनराज बाविस्कर (वय ४५ वर्ष) हिच्या सोबत शुल्लक कारणावरून वाद घालत चुल्यातील जळते लाकुड डोक्यात घालुन गंभीर जखमी करुन ठार मारण्यात आले. असे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन कायमी/ अप १९/२०२२ कलम ३०२ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोनि एस सी मिर्झा करीत आहे.