महाराष्ट्रराजकीय

२७ मीटर लांबी ठेवण्याचे गौडबंगाल, याची चौकशी व्हावी ; पालकमंत्र्यांकडे शिवसेना महानगर प्रमुखांची मागणी

धुळे (प्रतिनिधी) मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही १०/१२ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने प्रचंड गैरसोय भोगणाऱ्या धुळेकर नागरिकांना या नरकयातनेतून मुक्तता होण्यासाठी धुळे मनपा/ एमजीपी व योजनेचे ठेकेदार यांची मंत्रालयात तात्काळ बैठक लावण्याबाबत अक्कलपाडा ते हनुमान टेकडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अक्कलपाडा धरणात सुरू असलेल्या (मंजूर डिझाईन) १७७ मीटर लांबी जॅकवेलमध्ये बदल करून फक्त २७ मीटर लांबी ठेवण्याचे गौडबंगाल काय याची चौकशी व्हावी अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शिवसेना महानगर प्रमुख मनोजभाऊ मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

धुळे महानगरातील नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड वणवण आहे. भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या मनपा कडून होणार्‍या पाणीपुरवठय़ाचे नियोजन कायम स्वरूपी बिघडलेले आहे. १०/१२ दिवसाआड पाणीपुरवठा हे नित्याचेच झाले आहे. वास्तविक पाहता धुळे महानगरासाठी उपलब्ध पाणीसाठा प्रचंड प्रमाणात आहे. धुळे महानगराला पाणीपुरवठा करणारे स्तोत्र ज्यात तापी योजना/हरण्यामाळ धरण/अक्कलपाडा धरण/नकाने तलव/डेडरगाव तलव यात अनेक वर्षांपासून प्रचंड जलसाठा उपलब्ध असून धुळे महानगरासाठी आरक्षित आहे. सतत ३ वर्षे पाऊसच पडला नाही तरी धुळे शहराला रोज पाणीपुरवठा होऊ शकतो. इतका प्रचंड जलसाठा उपलब्ध असूनही “काखेत कळसा आणि गावाला वळसा” अशी धुळेकर नागरिकांची दयनीय अवस्था झाली आहे.

२०१५ पासुन १३६ कोटीची UIDSSMT पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महानगरात तब्बल ३५० किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली आहे. नवीन ७ जलकुंभ बांधुन तयार आहेत. २०१९/२० पासुन १३३ कोटीची अक्कलपाडा ते हनुमान टेकडी योजना जवळपास ८०%पूर्ण झाली आहे. या योजनेचा फायदा असा आहे की अक्कलपाडा धरणातून पाईपलाईनद्वारे येणारे पाणी ०% गळतीने डायरेक्ट हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रा पर्यंत ग्रॅव्हिटी ने येणार आहे. यात मनपाच्या वीजबिलात प्रचंड अशी ८० ते ९० लक्ष रुपये महिन्याला बचत होणार आहे. परंतु प्रचंड भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या मनपा सत्ताधाऱ्यांनी या योजनांचा बट्ट्याबोळ करून ठेवला आहे.

अक्कलपाडा ते हनुमान टेकडी पाणीपुरवठा योजनेत अक्कलपाडा धरणाच्या काठापासून धरणाच्या मध्यभागात जवळपास १७७ मीटर जॅकवेल योजनेच्या मंजूर डिझाईन मध्ये असताना त्यात १५० मीटर लांबी कमी करून वर्तमान परिस्थितीत फक्त २७ मीटर लांबी कायम ठेवली आहे. याचे गौडबंगाल काय हा देखील धुळेकर नागरिकांना भेडसावणारा मोठा प्रश्न आहे. या भ्रष्टाचाराने बरबटलेले व नियोजन शून्य कारभारामुळे धुळेकर नागरिकांच्या नशिबी असलेली वर्षानुवर्षे होत असलेली पाण्यासाठीची भटकंती आपल्या हस्तक्षेपा शिवाय संपणारी नाही त्यामुळे तात्काळ धुळे मनपा/एम जी पी ठेकेदार/शिवसेनेचे शिष्टमंडळ अशी एकत्रीत आपल्या उपस्थितीत बैठक घेऊन धुळेकर नागरिक भोगत असलेल्या नरक यातनेतून सुटका करण्यांचे शिवसेना महानगर प्रमुख मनोजभाऊ मोरे , माजी नगरसेवक संजयभाऊ वाल्हे, समाधान शेलार, छोटूभाऊ माळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे