सामान्यांना शासनाच्या व्ययक्तिक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी अब्दुल समीर यांचा मतदारसंघात दौरा
पात्र लाभार्थ्यांनी संचिका दाखल करण्याचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांचे अवाहन
सिल्लोड (विवेक महाजन) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडविण्यासह शेतकरी, शेतमजूर व सामान्यांना शासनाच्या विविध व्ययक्तिक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघात दौरा सुरू केले आहे.
उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी भवन, भराडी, शिवना सर्कल मधील विविध गावांत गावकऱ्यांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी तसेच सामान्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी व्ययक्तिक सिंचन विहीर, गाईसाठी गोठा, शेळीपालन, कुकुटपालन, निराधारांसाठी श्रावण बाळ, संजय गांधी , रेशन कार्ड ,शेतमजूर व बांधकाम करण्याऱ्या मजुरांसाठी योजना आशा प्रकारच्या योजनेतून लाभ देण्यात येतो यासह समाजकल्याण विभाग व शासनाच्या विविध योजनेची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी यासाठी संचिका दाखल करण्याचे आवाहन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे.
व्ययक्तिक लाभाच्या योजना मिळवितांना सामान्यांची कोठेही अडवणूक पिळवणूक होवू नये तसेच एकही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी मतदारसंघात सदरील उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी मूल्य घेतल्या जात नाही. यासाठी लागणारे मार्गदर्शन व संचिका युवासेनेच्या वतीने मोफत देण्यात येत आहे असे स्पष्ट करीत शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पैसे देणार आणि घेणार दोघेही गुन्हेगार असतात.त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत कोणत्याही योजनेची संचिका दाखल करतांना आर्थिक व्यवहार करु नये असे आवाहन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे.