राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते घाटनांद्रा सर्कल मधील विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
सिल्लोड (विवेक महाजन) घाटनांद्रा सर्कल मधील विविध गावात 6 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन तसेच शिवसेना – युवासेना शाखेचे उदघाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.
यावेळी जालना शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, औरंगाबाद जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, पंचायत समिती सभापती डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीष ताठे, हरिदास दिवटे, नॅशनल सुतगीरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, युवासेनेचे शेख इम्रान ( गुड्डू ), प्रवीण मिरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घाटनांद्रा सर्कल मधील कोटनांद्रा, तळणी, शिंदेंफळ , चिंचवण, आमठाणा, देऊळगाव बाजार, पेंडगाव, धारला, घाटनांद्रा , चारणेर, चारणेरवाडी धावडा आदी गावात भेट देवून गावकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने व्ययक्तिक सिंचन विहिराचा लाभ देण्यात येतो. याबाबत लवकरच बैठक होणार असून शेतकऱ्यांनी व्ययक्तिक सिंचन विहिरीसह शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी संचिका दाखल करण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन गावकऱ्यांनी खबरदारी घेत नियमांचे पालन करावे तसेच गावात 100 टक्के लसीकरण होण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे अवाहन करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घाटनांद्रा सर्कल मधील मंजूर व प्रस्तावित विकास कामाबद्दल नागरिकांना माहिती दिली. येत्या मार्च महिन्यामध्ये पानंद रस्त्यांचा विकास साधण्यासाठी मातोश्री पानंद रस्ते विकास अभियान राबविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी आमठाणा येथे नामदेवराव कदम, राहुल सपकाळ, अंबादास चौधरी, भागवत मोरे देऊळगाव बाजार येथे सरपंच शिवाजीराव देशमुख, उपसरपंच श्रीराम कुंटे, गणेश गरुड, पुंजाराम गरुड, मधुकर गरुड, दीपक सोनवणे, देविदास गरुड, अजीज देशमुख, शिंदेंफळ येथे बापू जाधव, रानुबा शिंदे, नारायण करडेल, रामसेट बखळे, पंढरी अक्कलकर, दौलत अक्कलकर, तळणी सरपंच प्रभाकर ठोंबरे, उपसरपंच मॅचिंद्र उसारे, लक्ष्मण ठोंबरे,चिंचवण येथे नरेश जाधव बाबुराव वाघमोडे, लाल गिरी, समाधान स्वर, नवनाथ इंगळे, मोईन शहा, फेरोज शहा आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती.



