महाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकराजकीयविशेष
Trending

ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री. प्रताप सरनाईक यांना प्रचंड मतांनी विजयी करा – प्रा. अशोराज तायडे यांचे मतदारांना आव्हान

विशेष प्रतिनिधी – दिनांक १५-११-२०२४ आज रोजी महाराष्ट्र विधान सभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष महायुतीच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री. प्रताप सरनाईक यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आव्हान प्रजशक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अशोराज तायडे यांनी आज रोजी मतदारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून केले.

हि निवडणूक हि महाराष्ट्र हिताची असून गेल्या काळात महायुती सरकार ने राज्यात जे काम केले ते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाठी महत्वाचे ठरले आहे. ह्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव होणार असून त्यांनी लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले असेही प्रा. अशोराज तायडे ह्यावेळी बोलले तरी येत्या २० नोव्हेंबर ला महायुतीला भरभरून मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा अशी विनंती त्यांनी ह्या वेळी मतदारांना केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे