महाराष्ट्र
जिल्हा काँग्रेस कमिटी व मुक्ताईनगर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
मुक्ताईनगर (सचिन झनके) काँग्रेस कमिटीच्या व मुक्ताईनगर काँग्रेस कमिटीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मेंढोदे गावामध्ये दुसऱ्या टप्प्यातील भूखंड कब्जा हक्क रकमेचा सरासरी दर कमी करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदिप पवार, ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, मुक्ताईनगर तालुका काँग्रेस अध्यक्ष दिनेश पाटील, ह भ प गुलाबराव महाराज, मेंढोदे गावचे सरपंच सोपान सपकाळे, कार्याध्यक्ष राजू जाधव, एस सी सेलचे अध्यक्ष निलेश भालेराव, ओबीसी तालुकाध्यक्ष निखिल चौधरी व काँग्रेसचे पदाधिकारी हजर होते.