महाराष्ट्र
कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या सात जनावरांची पोलिसांनी केली सुटका
धुळे (विक्की आहिरे) शहरातील वडजाई रोडवरील बोरसे कॉलनीतील गंगा टाइल्स जवळ एका पिकप मध्ये कत्तलीचा उद्देशाने बांधून ठेवलेल्या सात जनावरांची चाळीसगाव रोड पोलिसांनी सुटका केली. सर्व जनावरांची रवानगी गोशाळेत करण्यात आली.
या प्रकरणी पिकअप व्हॅनसह सात जनावरे मिळून एकूण 3 लाख 63 हजार यांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी व्हॅन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथक पाहणी करत असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी इंद्रजीत ईश्वर वैराट यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डीवायएसपी दिनकर पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.