गुन्हेगारीमहाराष्ट्र
शेतातील विहिरीत पडून एकाचा मृत्यू
धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील फागणे येथे शेतात असलेल्या विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील विलास साहेबराव बडगुजर (वय ४७) हे राजेंद्र पुरुषोत्तम सूर्यवंशी यांच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतात काम करत असताना ते शेतातील विहिरीत पडले. या घटनेत यांचा मृत्यू झाला. त्यांना नागरिकांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढण्यात आले परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.