महाराष्ट्र

तिसगांव शिवारातील हेलग्या नाल्यावरील बांधाऱ्याचे जि.प.सदस्य राम भदाणे यांच्या हस्ते भूमीपुजन

धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील नगांव गृप ग्रामपंचायत अंतर्गत मौजे तिसगांव येथील हेलग्या नाल्यावर जिल्हा वार्षीक योजनेंतर्गत लघु पाटबंधारे विभागाकडून लहान बंधारा जि. प. सदस्य राम भदाणे यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आला होता. सदरच्या बांधाऱ्याच्या कामाचे भूमीपुजन जि. प. राम भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या बंधाऱ्यामुळे तिसगांव येथील शेकडो एकर शेती ओलीताखाली येणार आहे. या भूमीपुजन कार्यक्रमाप्रसंगी पं. स. सदस्य रामदास पाटील, ग्रा. पं. सदस्य शिवाजी यशवंत अहिरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. नगांव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजे तिसगांव येथील हेलग्या नाल्यावर बांधारा बांधण्यात यावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी पाठपुरावा केला सदर बांधाराचे काम लघु पाटबंधारे विभागाकडून जिल्हा वार्षीक योजनेतून मंजूर करून निधी उपलब्ध करून घेतला. सदरचे कामाचे भूमीपुजन जि. प. सदस्य राम भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राम भदाणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना म्हणालेत की, सिंचनाची सोय झाली तर शेतकरी निश्चितच सुखावेल त्यामुळे परिसरातील नादुरुस्त बंधारेही तत्काळ दुरुस्त करण्यात येतील व नवीन लहान लहान बंधारे देखिल बांधण्यात येतील असे आश्वसीत केले. बांधारा भूमीपुजनाच्या प्रसंगी पंचायत समिती लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता ए. बी. पाटील, शाखा अभियंता के. डी. देवरे, शेतकरी रामदास काशिनाथ पाटील, गोरख जगन्नाथ पाटील, छोटू साहेबराव पाटील, विजय भास्कर पाटील, रतिलाल नाना हाके, प्रदिप दोधू पाटील, एकनाथ मोहन हाके, संजय बाबुराव माने यांच्यासह कामाचे ठेकेदार व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे