Horoscope : आजचे राशिभविष्य, शनिवार १४ मे २०२२
मेष
आज दिवस तुम्हाला भाग्यदायक आहे. चंद्र मन आनंदित ठेवेल. लाभ स्थानातील शुक्र स्त्रीवर्गाकडून अकल्पित लाभ प्राप्त करून देईल. दिवस शुभ.
वृषभ
आज आर्थिकदृष्ट्या दिवस मध्यम आहे. अनपेक्षित खर्च झाले तरी आनंद मिळेल. नावलौकिक वाढेल. दिवस शुभ फल देईल.
मिथुन
अचानक प्रवास योग, भाग्यातील शनी-मंगळ धार्मिक कार्यात यश देतील. शुक्राचा आनंददायक वावर तुम्हाला नवीन शुभ घटनांची चाहूल देईल. प्रकृती सांभाळून असा. दिवस मजेत जाईल.
कर्क
राशीच्या तृतीय स्थानातील चंद्र अचानक उलाढाल घडवेल. दिवस सुट्टीचा आहे तरी तुम्हाला काही नवीन जबाबदारी येईल. घरातदेखील काम राहिल. दिवस मध्यम जाईल.
सिंह
आज दिवस भाग्यदायक असून अध्यात्मिक अनुभव देईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. आर्थिक लाभ होतील. गाठीभेटी होतील. दिवस सौख्याचा जाईल.
कन्या
आज दिवस गडबडीचा आणि कष्टाचा आहे. अंगावर घेतलेली जबाबदारी जास्त ताण देईल. मात्र विचलित होऊ नका. दिवस शांतपणे घालवा.
तूळ
आज जोडीने आनंदात गृह सौख्य अनुभव कराल. हर्ष आणि उल्हास याने मन भरून जाईल. नातेवाईक भेटतील. दिवस शुभ.
वृश्चिक
आज दिवस कोणाशीही वाद विवाद न करता घालवा. शत्रू निर्माण होतील. मात्र नवीन वर्षात दिवस ईश्वराची सेवा करण्यात घालवा. आर्थिक बाजू जपा.
धनु
राशीच्या दशम स्थानातील चंद्र सामाजिक जीवनात प्रतिष्ठा आणि आनंद मिळवून देईल. आर्थिक लाभ होतील. मुलासोबत दिवस सुखात जाईल.
मकर
तुमच्या धनस्थनातील ग्रह अजूनही ताण देत आहे तरी आज भाग्य उजळेल. आनंदात दिवस साजरा करताना त्रास विसरून जाल. दिवस शुभ आहे.
कुंभ
राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानीपासून जपावं. मात्र अचानक होणारा धनलाभ आनंद देईल. नवीन वस्त्र, दागिना खरेदी कराल. दिवस उत्तम.
मीन
आज उच्च प्रतीचा लाभ मिळणार असून आर्थिक बाजू समृद्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. दिवस अतिशय गडबडीत जाईल.