अमळनेरात वैशिट्यपूर्ण योजना आणि विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत कोट्यवधीच्या कामांना मंजुरी
आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांने शहरात मोठी बरसात
अमळनेर : येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामिण भागात विकासाची घोडदौड सुरू असताना शहराला देखील तेवढेच झुकते माप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे,महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्यांनी शहरातील विकास कामांसाठी सुमारे 5 कोटींच्या वर निधीस मंजुरी मिळवली आहे.
अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजना तसेच विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत निधी त्यांनी प्राप्त केला आहे.आमदार पाटील यांनी याआधी देखील मोठा निधी अमळनेर नगरपरिषदेस मिळवून दिला असल्याने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान नूतनीकरण, अनेक प्रभागात सामाजिक सभागृह व रस्ते,सुशोभीकरण अशी भरीव कामे होत आहेत.
ही आहेत मंजूर कामे
वैशिट्यपूर्ण योजना आणि विशेष रस्ता अनुदान योजनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 16 मध्ये श्री भास्कर तापीराम चव्हाण यांच्या घरापासून (पिठाची गिरणी) ते बापुजी भिका महाजन यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे,20 लक्ष,प्रभाग 2 अंतर्गत गुलाब वसंत पाटील ते सानेनगर रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे 30 लक्ष,बालाजी स्टील ते श्री भद्राप्रतिक मॉल पर्यंत रस्ता मजबुतीकरण,रुंदीकरण व डांबरीकरण गटारीसह करणे,50 लक्ष,मंगलमूर्ती पतपेढी ते रेल्वे स्टेशन उड्डाणपुलापर्यंत रस्ता रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण,गटारीसह करणे,50 लक्ष,प्रभाग 3 मध्ये रस्ते ट्रीमिक्स काँक्रीट करणे 30 लक्ष,प्रभाग 13 बालाजीपुरा मधील रस्ते ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे 30 लक्ष,तसेच प्रभाग 14 मध्ये आर के नगर भागात अंतर्गत रस्ते गटारीसह ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे 60 लक्ष, आणि बहादरपूर नाक्याजवळ मुस्लिम कब्रस्थानचे कंपाउंड आणि सुशिभिकरण 30 लक्ष,छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकसित करणे 30 लक्ष,आणि महत्वाचे म्हणजे ढेकूरोडवर अभ्यासिकेचे बांधकाम करणे 2 कोटी अशी भरीव विकासकामे आमदारांनी मंजूर केली आहेत.
महत्वपूर्ण कामे लावली मार्गी
वरील कामांचे स्वरूप लक्षात घेता अतिशय महत्वपूर्ण रस्त्यांची कामे आमदारांनी मार्गी लावली आहे,भद्राप्रतिक मॉल जवळील प्रताप महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने विशेष करून विद्यार्थ्यांची मोठी कसरत होत असते,यामुळे हा रस्ता नवीन व्हावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती यामुळे आमदारांनी या रस्त्याला प्राधान्य देऊन एकप्रकारे विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे. याव्यतिरिक्त मंगलमूर्ती पतपेढी कडून रेल्वे स्टेशन मार्गे उड्डाणपूलास जोडणारा रस्त्यासही मंजुरी मिळवून स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना दिलासा दिला आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते आणि कामे महत्वपूर्णच असून शिवाजी उद्यानास आधीचे 50 लक्ष वगळता अजून 30 लाख वाढीव निधी दिल्याने आधुनिक पद्धतीचे उद्यान विकसित होणार आहे,या उद्यानाचे जोमाने काम सुरू आहे,तसेच ढेकूरोडवर सुमारे 2 कोटी निधीतूंन निर्माण होणारी अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी एक अनमोल भेटच ठरणार आहे,जवळपास सर्वच प्रभागास न्याय देण्याचा प्रयत्न दिसत असून अजून काही प्रभागात प्रस्तावित कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी देत येणाऱ्या काळात आपल्या शहराचे रूप पूर्णपणे बदललेले दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सदर निधीस मंजुरी दिल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना उद्वव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना अजित पवार व नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे यांचे शहरातील जनतेच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले आहेत.