सिल्लोडच्या सर्वरोग निदान ,रक्तदान व महालसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सिल्लोड (विवेक महाजन) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम अंतर्गत सिल्लोड येथे आयोजित मोफत सर्वरोग निदान,उपचार, रक्तदान व महालसीकरण शिबिरास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करीत रक्तदानास सक्षम असलेल्या जवळपास 251 जणांनी स्वयंस्फूर्तीने या शिबिरात विक्रमी रक्तदान केले. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत 12 तासात टप्याटप्याने जवळपास 5000 नागरिकांची तपासणी करून त्यांना औशोधोपचार देण्यात आला. तर अनेकांना कोरोना लसीचे पहिला तर काहींना दुसरा डोस देण्यात आला. या शिबिरात कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी आयोजकांच्या वतीने नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सर्वरोग निदान, उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येते. काळाची गरज ओळखून त्यांनी याही वर्षी सर्वरोग निदान , रक्तदान व महालसीकरण शिबिर सारखे सामाजिक उपक्रम राबविले. गोरगरीब व गरजूंना या शिबिराचा निश्चितपणे लाभ होईल असे स्पष्ट करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार आज राजकारणात मोठ्या पदावर असले तरी गोरगरीबांप्रति त्यांची सामाजिक बांधिलकी त्यांनी जपून ठेवली . राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे कर्तव्यदक्ष राजकारणी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सिल्लोड येथे केले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत भव्य सर्वरोग निदान, उपचार, रक्तदान व महालसीकरण शिबिराचे उदघाटन तसेच सिल्लोड येथील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व येथील कोरोना केअर सेंटर चे लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शन करीत असतांना पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आमदार अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश गटणे, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नॅशनल सुतगीरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार विक्रम राजपूत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके ,वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नासेर पठाण, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल,तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, सुदर्शन अग्रवाल , युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हनिफ, दीपाली भवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरोनाला रोखण्यासाठी मतदारसंघात विविध उपाययोजना राबवित सर्वसामान्य नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले आता तुम्ही देखील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करून 100 टक्के लसीकरण करून आपले कर्तव्य पार पाडा अशा शब्दांत पालकमंत्री ना. देसाई यांनी नागरिकांना लसीकरण करण्याबाबत अवाहन केले.कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात केवळ 2 लॅब होत्या. कोरोना सोबत लढण्यासाठी पाहिजे तितक्या सुविधा नव्हत्या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोरोनवर नियंत्रण मिळविले. संपूर्ण देशासह मा. हायकोर्टने मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांचे कौतुक केले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्यसरकार सज्ज असून कोरोना हारेल पण राज्यसरकार हरणार नाही यापद्धतीने राज्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण झाले असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले.
सर्वरोग निदान शिबिरात डॉक्टरांचे मोलाचे योगदान असून या शिबिरात मिळालेल्या उपचारानंतर सामान्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य प्रेरणादेवून जाते असे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.
ओमायक्रोन व कोरोना नियमांच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन व्हावे यासाठी वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून केवळ आरोग्य शिबीर उपक्रम घेतला. या शिबिरात गरजूंना येण्यासाठी बस नसल्याने रुग्णांना मोफत वाहनांची व्यवस्था करण्यात आली. या शिबिरात एमआरआय , ईसीजी, एक्सरे, रक्त लघवी तपासणी इत्यादी सुविधा मोफत देण्यात येत असून गंभीर आजारांच्या रुग्णांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद, शिर्डी, पुणे , मुंबई सारख्या ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
सिल्लोड तालुका शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका असल्याने येथे रोजगार निर्मितीला चालना मिळाली यासाठी भोकरदन रोड लगत औद्योगिक वसाहत निर्माण करून येथे नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
सिल्लोड येथे आयोजित रक्तदान शिबिरात उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह, शिवसेना- युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी, कर्मचारी आदींनी रक्तदान केले. रक्तदान करणे हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आपण या शिबिरात सहभागी होवून रक्तदान केल्या बद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आभार व्यक्त केले.
शिबिर यशस्वी होण्यासाठी शिवसेना, युवासेना, राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळ, शिवसेना नगरसेवक, नगर परिषद, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, धन्वंतरी मेडिकल व डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले.