शिंदखेडा शहर आणि परिसरातील नागरिकांना पोलिस प्रशासनातर्फे जाहिर दवंडीने आवाहन
शिंदखेडा (यादवराव सावंत) आपण आपल्या कामासाठी बाहेरगावी सहकुटुंब घर बंद करून जात असाल तर … चोरटे नेहमी बंद असलेल्या घरांना लक्ष करित आहे. त्यामुळे शिंदखेडा शहर आणि परिसरातील नागरिकांना पोलिस प्रशासनातर्फे जाहिर दवंडीने आवाहन करण्यात आले.
१. नागरीकांनी आपल्या मौल्यवान वस्तू, पैसे बँक लॉकर मधे ठेवावेत अगर आपले सोबत घेवून जावेत.
२. आपल्या शेजारी असलेल्या अथवा नातेवाईक, आप्तेष्ट यांना सूचना द्यावी.
३. त्यांना दररोज घरी जाऊन रात्री पहाणी करायला शक्यतो घर उघडून अर्धा तास घरात लाईट सुरू करायला सांगावे शक्यतो आप्तेष्ट / मित्र / शेजारी यांना रात्री घरी मुक्कामास राहाणे बाबत सांगावे.
४. नागरिकांनी आपल्या भागात एकमेकांशी संपर्क वाढवून गल्ली मध्ये / कॉलनी तसेच दुकानांवर येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींच्या हालचाली कॅमे-यात दिसतील अशा रितीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत.
आपला शेजारी खरा पहारेकरी ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणावी, नागरिकांनी सतर्क राहून यंत्रणेला सहकार्य करावे. असे सुनील भाबड पोलिस निरीक्षक
शिंदखेडा, जि धुळे यांनी जाहीर दवंडीद्वारे शहर वासियांना आवाहन केले आहे.