विनोद जनरल स्टोअर्स पुढे लावलेली-श्रीचंद मास्तर यांची मोटरसायकल चोरीला
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथे माणसांच्या गर्दीने नेहमी फुललेल्या राजपथ रस्त्यावर असलेल्या विनोद जनरल स्टोअर्ससमोर लावलेली श्रीचंद मास्तर कुकरेजा यांची मोटरसायकल दिवसाढवळ्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शहरात मागील महिन्यापासुन घर व दुकानापुढे लावलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली असुन, एकट्या सिंधी समाजाच्या महिन्याभरात घर व दुकानापुढे लावलेल्या तीन मोटरसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्यामुळे व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. म्हणुन चोरी गेलेल्या मोटरसायकली परत मिळवून व्यापाऱ्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना दुर करावी, असा सुर व्यापारी वर्गात निर्माण होत आहे.
याबाबत आज दोंडाईचा पोलीस स्टेशनला श्रीचंद मास्तर कुकरेजा यांचा मुलगा नामे विजयकुमार श्रीचंद कुकरेजा (वय ३५) राहणार सिंधी कालनी, दोंडाईचा यांनी दिलेली तक्रार अशी की,मी वरील ठिकाणी आई-वडील, पत्नी,मुलांसह राहतो.माझे स्टेशन भागात राजपथ रस्त्यावर विनोद जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. दुकानाच्या कामासाठी मी हिरो कंपनीची स्पेंल्डर स्प्रो.मोटरसायकल क्रमांक एम.एच.१८- ए.जी.-४८५२ ही घेतलेली आहे. दिनांक ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मोटरसायकल नेहमीप्रमाणे दुकानासमोर लावलेली होती.त्यात अर्धा-एक तासासाठी लाईट गेल्याने त्यानंतर दुकानासमोर लावलेली मोटरसायकल क्रमांक एम.एच.१८-ए.जी.-४८५२ मिळून आली नाही. तिचा इतरत्र-गावात शोध घेतला.तरी मिळून आली नाही. म्हणून आज दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येऊन मोटरसायकल चोरीची तक्रार देत असुन, चोरी झालेल्या मोटरसायकलचा तपास लावून मला माझी मोटरसायकल परत मिळवून द्यावी, अशी लेखी तक्रार दिली आहे.
सध्या शहरात घर व दुकानापुढे लावलेल्या मोटरसायकली व इतर साहित्य चोरीला जाणाच्या घटनेत वाढ झाली आहे. एकट्या सिंधी समाजाच्या महिन्याभरात तीन व्यापाऱ्यांच्या मोटरसायकली घर व दुकानापुढून दिवसाढवळ्या चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्गात वस्तु व मालबाबत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.म्हणुन चोरी झालेल्या मोटरसायकली व इतर वस्तु परत मिळवून स्थानिक पोलीस विभागाने व्यापाऱ्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना दुर करावी, असा सुर व्यापारी वर्गात सध्याच्या परिस्थितीवर निघत आहे.