महाराष्ट्र

शिंदखेडा येथे माजी मंत्री तथा खा. डॉ सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत भुषण बागुल याचा सत्कार

शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा येथील रहिवासी व अमरिशभाई आर.पटेल स्कुल सीबीएसई शिरपूर येथील विद्यार्थी भूषण गिरीश बागुल ज्युनिअर स्किल नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये संपूर्ण भारतात प्रथम आल्याबद्दल त्याचा आज बिजासनी मंगल कार्यालय शिंदखेडा येथे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्कार माजी मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित कामराज निकम उपाध्यक्ष जि प धुळे, नारायण पाटील जिल्हाध्यक्ष भाजपा तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा, अनिल वानखेडे नगरपंचायत गटनेते, भरत पवार पं स सभापती शिंदखेडा , डी आर पाटील जि प सदस्य, पंकज कदम जि प सदस्य, भिला पाटील उपनगराध्यक्ष नगरपंचायत शिंदखेडा, उपसभापती प स शिंदखेडा, नगरसेवक प्रकाश देसले , शिंदखेडा व पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसंगी भूषण चे वडील गिरीश बागुल यांनी प्रास्ताविक करताना स्पर्धेचे स्वरूप विशद केले आणि देश पातळीवर पहिला कसा आला याविषयी सविस्तर बोलले खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी कौतुक करताना ग्रामीण भागातला एक मुलगा सुद्धा देश पातळीवर पहिला येवू शकतो असे गौरवोद्गार काढले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे