महाराष्ट्र

अवैध व्यवसायास पोलीस अधिकारी जबाबदार !

कारवाई करा : आमदार डॉ. शाह यांनी मागणी

धुळे (स्वप्नील मराठे) शहरासह जिल्ह्यात सरासपणे अवैध धंदे सुरू आहेत. ज्या भागात अवैध व्यवसाय सुरू असतील अशा अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, अशा मागणीचे निवेदन आमदार डॉ. फारूख शाह यांनी गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना दिले.

परराज्यातील गुन्हेगार धुळ्यात सुरत, सेंधवा, गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यातील नामचीन गुन्हेगार शहरातील नटराज टाकीज परिसरात येथे एकत्र येवून गुन्हे घडविण्याचे नियोजन धुळे शहरात करतात. तसेच या भागात जुगार नशेच्या गोळ्या विक्री, सट्टापिढ्या देखील सुरू आहेत. त्या अधिकाऱ्यांची बदली करा गृह विभागाच्या परिपत्रकान्वये ज्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरु असतील त्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यास जबाबदार धरून त्याच्यावर कार्यवाही करणेबाबत नमूद आहे. त्यानुसार जिल्हा गुन्हा अन्वेषण खेचे तीस निरीक्षक शिवाजी बुधवंत आणि पोलीस निरीक्षक आनंद कोकरे जबाबदार आहेत.

मंत्री देसाई यांच्याशी चर्चा करतांना आमदार डॉ. फारुख शाह, या अधिकाऱ्यांची विभागीय समितीमार्फत चौकशी करावी तसेच त्यांची इतरत्र बदली करण्यात यावी. या आशयाचे निवेदन शहराचे आमदार फारुक शाह यांनी गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना दिले आहे. यावेळी त्यांनी कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे