राष्ट्रवादी मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या विकासकामाच्या मागण्या पूर्ण
मुक्ताईनगर (सचिन झनके) (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर व बोदवड शहरातील अल्पसंख्यांक समाज बांधवांना लग्न व इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत गट नं 714 येथे आणि बोदवड नगरपंचायत हद्दीत गट नं 424 मध्ये शादिखाना हॉलचे बांधकाम करण्यासाठी माजी महसुल कृषी मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांनी दि 21 मार्च 2022 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निधि मंजुर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुक्ताईनगर व बोदवड येथे शदिखाना हॉल बांधकाम साठी प्रत्येकी 1 कोटी असा सुमारे 2 कोटी रुपयांच्या शदिखाना हॉल बांधकामाला राज्य शासनाच्या वतीने मंजुरी मिळाली आहे.
यातून मुक्ताईनगर व बोदवड येथे शदिखाना हॉलचे बांधकाम करण्यात येईल त्यामुळे अल्पसंख्यांक समाज बांधवांना लग्न व इतर कार्यक्रमासाठी सुसज्ज सुविधा निर्माण होईल, अल्पसंख्यांक समाज शिक्षणाच्या प्रवाहात यावा व त्यातून कुशल तंत्रज्ञ निर्माण व्हावे यासाठी एकनाथराव खडसे हे अल्पसंख्यांक विकास मंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर येथे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन मंजुर केले होते त्याचे काम सुरू असून उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासत होती ही बाब लक्षात घेऊन एकनाथराव खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार सुमारे 4 कोटी रुपये निधी मंजुर झाला असून यातून तंत्रनिकेतनचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येऊन येत्या शैक्षणिक वर्षांपासून तंत्रनिकेतन सुरू करण्यात येईल.



