भुसावळ तहसील येथे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा
भुसावळ (प्रमोद बावस्कर) जागतिक ग्राहक दिनानिमित्त दि.१५ मार्च रोजी तहसील कार्यालयात सपंन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक धिवरे तहसीलदार भुसावळ हे होते.
ग्राहक पंचायत चे प्रा.प्र. ह.दलाल, अँड.जास्वंदी भंडारी, अँड.कल्पना टेमानी, उपाध्यक्ष किरणं कुमार बोलके यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक धिवरे यांनी सांगितले की, ग्राहक संरक्षण कायदा 2020 याची अंमलबजावणी व सर्वसामान्य पर्यंत जाणीव, जागृती निर्माण करणे बदलत्या काळाची गरज आहे. किरण बोलके यांनी सांगितले की कोणत्याही प्रकारच्या खाद्य पदार्थ विक्रेत्या कडे फुड लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तीचे खाद्य सुरक्षा प्रशिक्षण व त्यांचे प्रमाणपत्र असणं अती आवश्यक आहे. आणि ग्राहक म्हणून आपण त्यांच्या कडे वरील लायसन्स पाहणे आपले कर्तव्ये आहे. अन्यथा कदाचित भेसळयुक्त आणि पॅकिंग मध्ये असलेले पदार्थ सुद्धा कधी कधी विक्रीसाठी असू शकतात ती तपासून घेण्याची जबाबदारी प्रत्येक ग्राहकाची आहे. या प्रसंगी ग्राहक पंचायतचे मिलिंद मांडळकर, सुयोग चौधरी, प्रा. उदय सूर्यवंशी, देवेश वाणी, प्रा.शरद पाटील, प्रा. युवराज कुरकुरे, मिलींद महाजन, तहसील कार्यालयातील कर्मचारी व व्यापारी व प्रतिनिधी उपस्थित होते. अतिशय उत्साहाने कार्यक्रम साजरा झाला.