बोदवड तालुक्यातील १० रस्त्यांसाठी अर्थसंकल्पातुन ६ कोटी निधी
बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग हे जिल्हा परिषदेच्या निधीवर अवलंबून होते. जिल्हा परिषदेचा निधी तुटपुंज्या स्वरुपात असल्याने ग्रामीण भाग हा रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणपासुन दुर होता. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमिवर आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गाला निधी शासन स्तरावरून उपलब्ध व्हावा याबाबत मागणी केली होती. ठाकरे सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्त्यांना ६ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे सदरील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पार पडणार असल्याने जि.प. मदती अभावी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणा संदर्भात कामे थांबणार आता थांबणार नाहीत. ग्रामीण भागांतील गाव खेडे पक्क्या रस्त्याच्या माध्यमातून एकमेकांना जुळणार आहेत.
मंजुर झालेले रस्ते व निधी एकुण 10 कामे 617.5 लक्ष
1) एनगाव ते चिखली रस्ता ग्रामीण मार्ग 16 किमी 0/00 ते 1/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 28.5 लक्ष
2) साळशिंगी ते उजनी जलचक्र रस्ता इजीमा 31 किमी 0/00 ते 4/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 66.5 लक्ष
3) करंजी ते भानखेडा रस्ता ग्रामीण मार्ग 17 किमी 0/00 ते 2/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 66.5 लक्ष
4) मानमोडी ते विचवा रस्ता ग्रामीण मार्ग 42 किमी 0/00 ते 3/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 47.5 लक्ष
5) 5) मनुर बु ते राजुर रस्ता इजीमा 32 किमी 32 किमी 0/00 ते 3/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 57.00 लक्ष
6) लोणवाडी ते पिंपळगाव देवी रस्ता इजिमा 32 किमी 0/00 ते 2/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 47.5 लक्ष
7) वराड ते सुरवाडे खुर्द ग्रामा 66 किमी 0/00 ते 3/00 मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 66.50 लक्ष
8) सोनोटी ते बोदवड रस्ता ग्रामा 15 किमी 0/00 ते 2/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 47.50 लक्ष
9) निमखेड ते घाणखेड रस्ता ग्रामा 15 किमी 0/00 ते 2/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे किंमत 47.50 लक्ष
10) कोल्हाडी निमखेड रामा 270 हरणखेड चिखली मनुर खु मनुर बु रामा46 शेलवड रामा 753 एल प्रजिमा 90 किमी 25/00 ते 29/00 चे मजबुतीकरण डांबरीकरण करणे. किंमत 142.50 लक्ष