शिंदखेडा येथील किसान विद्यालय मुख्य केंद्रात कॉपी विरहित व तणावमुक्त १० च्या परीक्षेचे आयोजन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा येथील केंद्र क्रमांक २१६१ किसान विद्यालय येथे आज दिनांक १५ मार्च २०२२ मंगळवार रोजी मराठी या विषयाचा पहिला पेपर घेण्यात आला होता.त्याप्रसंगी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती डॉ सी के पाटील यांच्या हस्ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी तणावमुक्त, कॉपी विरहित वातावरणात पेपर लिहावेत व बोर्डाकडून मिळालेल्या सूचनांचे पालन करावे असे मार्गदर्शन करण्यात आले व आलेल्या सर्व परीक्षार्थींना सॅनिटायझ ,थर्मल स्कॅनिंग द्वारे आरोग्याची तपासणी करण्यात आली आणि परीक्षार्थींना रांगेने केंद्रावर कक्षेत सोडण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मंडळ यांच्या आदेशान्वये शाळा तेथे सेंटर नुसार मुख्य केंद्र किसान विद्यालय येथे एकूण प्रवेशित २७७ परीक्षार्थीं होते. त्यांपैकी मुख्य केंद्रात ८४ आणि बाकी सर्व वेगवेगळ्या उपकेंद्रात भडणे २७, पुज्य सानेगुरुजी माध्य विद्या चौगाव २८, महात्मा गांधी विद्या दराने ४२, एन डी मराठे माध्य विद्या ९६ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्याप्रसंगी मुख्य केंद्रावर शाळेचे मुख्याध्यापक डी जी पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस एस पवार, एस ए वाडीले, स्टेशनरी सुपरवायझर जे डी भदाणे, बीपी पवार, लिपिक प्रेरित पाटील उपस्थित होते व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.