द ग्रेट मराठा फाउंडेशनचे शिक्षक आघाडीचे अध्यक्ष उत्तमराव शेरेकर यांच्या हस्ते मैदानाचे उदघाटन
वरुड (रुपेश वानखडे) द ग्रेट मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष नितिन गुर्जर यांना न्यु इंग्लिश शाळेत पोलीस आणि आर्मी भरतीसाठी ग्राउंडवर सराव करत असलेले विद्यार्थ्यांनी मदत मांगितली की, पुढच्या मे महिन्यात आर्मीची भरती आहे. आम्हाला सराव करित असताना लॉन्ग जम्प च्या सरावसाठी धावपट्टी तैयार करायची आहे. पण त्यासाठी काळी रेती चालत नाही. बारीक रेती पाहिजे, ती 40 ते 50 हजार रुपयांची होते. सराव करत असलेले सर्व मुले आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. एक महिन्यापासून ते मदत मांगत होते. मात्र द ग्रेट मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष नितिन गुर्जर यांनी रेती उपलब्ध करुन दिली.
विद्यार्थी यांचा आग्रह होता कि, त्याच्या मैदानाचे उदघाटन आमच्या हस्ते व्हावे म्हणून आज द ग्रेट मराठा फाउंडेशनचे शिक्षक आघाडीचे अध्यक्ष उत्तमराव शेरेकर यांच्या हस्ते केले. यावेळी द ग्रेट मराठा फाउंडेशन चे उपाध्यक्ष दीपक कोचर, नितिन देवघरे, विशाल आजनकर, यशपाल राऊत, बंटी धरमठोक, तुषार सावरकर, रोशन धोण्डे, बबलू भोरवंशी, उमेश नागले, मंगेश कोहले उपस्थित होते. यावेळी मैदानावर सराव करणारे नितिन कडू, चौरे, हम्बरडे, रोशन निम्भोरकर, धीरज तट्टू, संदेश दौड़ आणि आर्मी भरतीचा सराव करत असलेल्या विद्यार्थ्यांनी द ग्रेट मराठा मल्टीपर्पज फाउंडेशनचे आभार मानले.