महाराष्ट्र

सोयगाव तालुका पेन्शनर्स असोशिएशन तर्फे एस.टी. कर्मचारी यांना पाठिंबा.

सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन, तालुका विशेष प्रतिनिधी

सोयगाव : काल शनिवारी सोयगाव तालुका पेन्शनर्स असोशिएशन च्या अध्यक्षांसह पदाधिकारी यांनी संपासाठी बसलेल्या कर्मचारी यांची भेट घेऊन पेन्शनर्स संघटनेचा एस टी कर्मचारी संपास पुर्ण पाठिंबा आहे,असे आबासाहेब बाविस्कर अध्यक्ष सोयगाव तालुका पेन्शनर्स असोशिएशन यांनी सांगितले.
संपावरील संघटनेचे यांनी पेन्शनर्सना असोशिएशन तर्फे पाठिंबाचे निवेदन देतांना संपाची पुर्ण माहिती घेतली एस टी आणि कर्मचारी यांचे बाबतीत बोलतांना ते म्हणाले ,”एस टी ही प्रत्येक समाजातील, प्रत्येक धर्मातील व्यक्तींच्या बाबतीत उपयोगी पडते.समाजातील प्रत्येक मुल भूत गरजा भागवण्याकामी उपयुक्त ठरते. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एसटीचे दळणवळण मोलाचे आहे . एस टी वाहतूक किफायतशीर ,प्रामाणिक, तत्पर आणि अहोरात्र चालणारी सुरक्षित अशी सेवा आहे.मध्यमवर्गिय आणि कनिष्ठवर्गीय यांच्या बहुपयोगी पडते. हे चालक ,वाहक तुटपुंज्या पगारासोबत आपला संसार,मुलांचे शिक्षण, विवाह,आजारपण सांभाळून लोंकांचे जीव सांभाळत सुरक्षित ठिकाणी पोचवून प्रामाणिक पणे आपले कर्तव्य बजावतो. हे कर्मचारी यांचे आर्थिकदृष्ट्या शोषण वर्षानुवर्षापासून होत आलेले आहे.बरेच कर्मचारी यांनी आर्थिकदृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत.एसटी परिवहन विलिनीकरण हे राज्य सरकारच्या अखत्यारित येणारी बाब आहे. राज्यसरकार करु शकत.परंतु ते झोपेचे सोंग घेतलेले आहेत. एसटी चा प्रश्न केवळ एसटीचाच नाही जनतेच्या हितासाठीचा आहे. त्यांचे पगारात देखील वाढ होणे गरजेचे आहे तरी मुख्यमंत्री महोदयांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा . पदाधिकारी आणि सोयगाव तालुका पेन्शनर्स असोशिएशन तर्फे महाराष्ट्र शासनाला विनंती पुर्वक निवेदन करतो की,एस टी कर्मचारी संपाच्या मागण्या मान्य करुन एस टी सेवा पुर्ववत करु जनतेचे होणारे अतोनात हाल थांबवण्या बाबत विनंती करतो.
सोयगाव तालुका पेन्शनर्स असोशिएशन चे चंद्रास रोकडे,भास्कर पिंगाळकर,आणि पुंडलिक सोहनी हे उपस्थित होते.
श्रीमती अनुराधा गोपाल महाले(निकम),जयराम सुर्यवंशी,राहुल ठाकूर,रामा पाटील, दिनेश विसपुते,धनगरसर,ई असे अनेक कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे