महाराष्ट्र
सोयगाव शहरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोयगाव (विवेक महाजन) महाशिवरात्री निमित्त (दि.01) मंगळवारी नारळीबाग येथील मंदिरातील जागृत महादेवाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी मंदिर समिती व जय भोले मंडळातर्फे महाआरती करण्यात आली व दर्शनासाठी आलेल्या भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
रात्री साडेआठ वाजता ह भ प भगवान महाराज, भगवानगड यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. मंदिर समिती व जय भोले मित्र मंडळातर्फे (दि.3) गुरुवारी भांडाराचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या विविध कार्यक्रमाचे आयोजन जय भोले महादेव मंदिर समितीचे विश्वस्त कृष्णा राऊत, बापू मानकर, नाना बागले,मुरली बागले आदींनी केले होते.