राजकीय

आजादी का अमृत महोत्सव करण्यात आला साजरा

सोयगाव (प्रतिनिधी) विवेक महाजन

सोयगाव : येथे तालुका विधी सेवा समिती ,सोयगाव जिल्हा औरंगाबाद यांच्या वतीने दि.१४ रविवारी गलवाडा येथे आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला अध्यक्ष स्थानी न्यायाधीश एस. एस.साळवे हे होते प्रमुख वक्ते धर्मराज सूर्यवंशी व जाधव, वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र गिरी ,पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाट ,सचिन गिरी,पंचायत समितीचे बी.एस. पुरी,हे मान्यवर होते
सुदाम सिरसाट यांनी कायदेविषयी माहिती सांगत त्यांनी एक उदाहरण सांगितले शेतीशिवाराच्या बांधावरून कोणी भांडू नये शेतीशिवार हे तर येथेच राहते पण आपण नातेसंबंध विसरून भांडणे करू नये असे त्यांनी अनेक उदाहरणे दिली
गलवाडा जय रूद्रेश्वर मित्रमंडळ यांच्या मध्येमातून अनिल इंगळे व सुनील सैदाने यांनी छोट्या खाणी एका नाटकांमधून वयाच्या लहान पनीच लग्न होत असे ह्या विषयी त्यांनी जनजागृती करून गावातील लोकांच्या कानी पोहचवले व शारदाताई इंगळे यांनी एका गाण्यांमधून बृहमन हत्या करू नये गाण्याचे बोल ‘गर्भात नको मारू आई ग मला’ ह्या गाण्याला राजेंद्र गिरी यांनी १०००रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले .जय रूद्रेश्वर मित्र मंडळ यांच्या मध्येमातून जनजागृती करण्यात आली तसेच सरपंच पंजाबराव कुनगर,उप सरपंच मधुकर इंगळे, ग्रामसेवक सत्यवान पुल्लेवाड ,सदस्य सुशीलाबाई इंगळे,दीपाली औरंगे, मंगलाबाई बिऱ्हारे,सुशिलाबाई इंगळे, रवींद्र जगताप,पोलीसपाटील मिलिंद सोनवणे, किशोर सोनवणे,रमेश चक्के, तुकडूदास इंगळे समस्त गावकरी कार्यक्रमला हजर होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे