एरंडोल व धरणगाव तालुका शिक्षक कर्मचारी पतपेढीच्या चेअरमनपदी प्रमोद चिलाणेकर
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील एरंडोल व धरणगाव तालुका शिक्षक व कर्मचारी पतसहकारी संस्थेच्या चेअरमनपदी आडगाव येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा टि डि एफचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पंचवार्षीक निवडणूकीत सहकार पॅनलच्या बहुमताने जागा निवडून आल्या असल्याने सहकार पॅनलचे प्रमुख प्रमोद पाटील चिलाणेकर यांना सर्व संचालकांनी सहमती दर्शवली. सहाय्यक निंबधक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी अधिकारी संजय पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. सभेत सर्वच संचालक उपस्थित होते. व्हा. चेअरमन नितीन कळंत्री, राजू पाटील, जितेंद्र बोरसे, धनराज मनोरे, नंदलाल भावसार, हेमंत महाजन, प्रशांत अहिरे, भारती पाटील, सुषमा बावीस्कर, रविंद्र पाटील, व्ही टी पाटील, चिटणीस चंद्रकांत महाले तसेच पथराड शाळेचे मुख्याध्यापक जगदीश पाटील उपस्थित होते . निवड प्रक्रियेसाठी संस्थेचे वाल्मिक बोरसे व रवि महाजन यांनी सहकार्य केले. संस्था स्थापनेला ३० वर्ष झाले असून संस्थापक चेअरमन पी ए पाटील व एस व्ही मारवाडी ए एस पाटील संचालक मंडळाने मेहनत घेऊन संस्था नावारूपाला आणली. आज संस्था सतत अ वर्गात असून ३० लाखापर्यन्त नफ्यात असते. विशेष म्हणजे आडगाव शाळेचे तिन्हीही मुख्याध्यापकांनी चेअरमन पद भूषविले. तिसरे पद प्रमोद पाटील चिलाणेकर यांना मिळाले.
संस्थेचा विस्तार दोन तालुका मिळून असून सर्वच शाळांचा सहभाग आहे. नवनिर्वाचित चेअरमन प्रमोद पाटील चिलाणेकर हे मुख्याध्यापक पासून कवी, लोकमत पत्रकार, राष्ट्रीय मानवाधिकारी सामाजिक न्याय संगठनचे जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष, भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष, राज्य समता शिक्षक परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष, टि डि एफ तालुकाध्यक्ष, मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष, आडगाव शिक्षण प्रसारक मंडळ व कै .आबासाहेब खंडेराव श्रीपत पाटील, सहकारी फ्रुटसेल संस्थेचे संचालक असून कै .आण्णासाहेब पी पी पाटील, प्रतिष्ठान तसेच पांडेनगर भागाचे उत्सव समिती अध्यक्ष असे अनेक सहकारी संस्थेवर कार्यरत आहे. त्यांच्या निवडीबदल राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, साहित्य, पत्रकारिता क्षेत्रातील जिल्हातील प्रतिनिधी सत्कार व अभिनंदन केले. चिलाणेकर हे सर्वच क्षेत्रातील निगडीत असल्याने मोठा जनसंपर्क व स्वभावाच्या भाडवंलावर त्यांनी लोक जोडले आहे. म्हणून त्यांच्या निवडीबदल सर्वत्र अभिनंदन होत आहे.