हस्ती प्रि प्रायमरी गृप ऑफ स्कूलचा २० वा वार्षिक क्रिडा दिन उत्साहात संपन्न !
दोंडाईचा (प्रतिनिधी) वि.प्र. हस्ती चँरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती प्रि प्रायमरी गृप ऑफ स्कूलस् दोंडाईचा शाळांचा वार्षिक क्रिडा दिवस शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांचे मार्गदर्शनाने दि. २० फेब्रुवारी २०२२ शनिवार रोजी हस्ती बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन दोंडाईचा येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्या देवी सरस्वती, स्व. हस्तीमलजी जैन, स्व. शांतीलालजी जैन, स्व. कांतीलालजी जैन यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ. अनिकेत पाटिल – दोंडाईचा तर उद्घाटक म्हणून निखीलकुमार जाधव – नगरसेवक – न.पा. दोंडाईचा व विशेष अतिथी म्हणून हस्ती स्कूलची माजी विद्यार्थीनी आणि सी. ए. हिमाली जैन हे लाभले होते. तसेच याप्रसंगी हस्ती स्कूल स्थानिक शालेय सल्लागार समिती उपाध्यक्षा सुषमा जैन, सुगंधा जैन, शितल जैन ह्या मान्यवर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर बाल खेळांडूचा शपथ विधी संपन्न झाला. यानंतर चिमुरड्यांनी फुलाच्या आकारात बसून मनोहारी कवायत सादर केली. तसेच योगासने, लेझीम नृत्य, पॅराशूट डान्स, ड्रील डान्स सुंदर पदलालित्यासह सादर केले. यानंतर बालकांसाठी रनिंग, कलेक्ट द बॉल, पेपर गेम, रोल अँड कलेक्ट द बॉल, हर्डल्स रेस अशा विविध खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. व माता पालकांसाठीही धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध खेळांच्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये अनुक्रमे प्रथम, व्दीतीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या खेळाडूंना सुवर्ण, रजत व कांस्य पदक देऊन कौतुक करण्यात आले. वार्षिक क्रीडा दिवस कार्यक्रमात हस्ती प्रि प्रायमरी इंग्रजी माध्यम विभाग, हस्ती विद्यारंभ सेमी इंग्लिश बालवाडी विभाग व हस्ती किंडर गार्टेन विभागातील बाल खेळाडू उत्साहात सहभागी झाले. सदरच्या कार्यक्रमाला शाळेचे पालक व परिसरातील क्रीडा रसिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने व आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
वार्षिक क्रीडा दिवस यशस्वी होण्यासाठी हस्ती पूर्व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका पूनम पाटिल, हस्ती विद्यारंभ सेमी इंग्लिश बालवाडी मुख्याध्यापिका स्मिता साठे, हस्ती किंडर गार्टेन समन्वयिका लिना सोनवणे आणि शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश खंडेराय, क्रीडा शिक्षक विशाल पवार, निलेश धनगर, तसेच सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
१. अतिथी- डॉ. अनिकेत पाटिल
” हस्तीचा हा वार्षिक क्रीडा दिवस म्हणजे सुंदर नियोजन व शिस्त यांच आदर्श उदाहरण पाहायला मिळालं. खेळांमुळे मानसिक व शारीरिक विकास साधला जातो. तसेच पालकांनी पाल्यांना त्यांच्या आवडीचा खेळ खेळण्यास प्रोत्साहित करावे. ”
२. विशेष अतिथी- हिमाली जैन
” हस्तीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मला पुढील शिक्षणाच्या वाटचालीत कुठेही उणीव भासली नाही. चांगल्या शिक्षणाच्या पायाभरणी माझी या शाळेतच झाली. याकरिता मी हस्तीची सदैव ऋणी आहे.”