राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची तळणी येथील अखंड हरिनाम सप्ताहास भेट
सिल्लोड : तळणी ता. सिल्लोड येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद संगीत रामकथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधत आयोजित पारायण सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तळणी येथे श्री बालाजी मंदिर समोर सभागृह बांधकामासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 20 लाख रुपयांचा निधी दिला होता याचे काम प्रगती पथावर असून या कामाचा यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा घेतला.
येथील जुने महादेव मंदिर समोर भाविकभक्तांच्या सोयीसाठी 20 लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, नॅशनल सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र (बापू) पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे यांच्यासह तळणी व परिसरातील भविकभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.