हस्ती बँक व लायन्स क्लबतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन
दोंडाईचा (प्रतिनिधी) वि.प्र. दोंडाईचा मुख्यालय असलेल्या व राज्यभर कार्य विस्तारासोबत सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या नावलौकिक प्राप्त उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दि हस्ती को. ऑप. बँकेच्या ५० वा वर्धापन दिन निमित्त हस्ती बँक व लायन्स क्लब दोंडाईचा तर्फे दिनांक ९ जानेवारी २०२२ रविवार रोजी हस्ती प्रि – प्रायमरी स्कूल काराणी ज्ञानदीप इमारत, स्टेशन भाग दोंडाईचा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हस्ती बँक व लायन्स क्लबच्या सहकार्याने दरवर्षी रक्तदान शिबीर घेण्यात येते. रक्तदान शिबिराचे हे सलग १५ वे वर्ष असून; आत्तापर्यंत अनेक गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात किंवा विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्यात आले आहे. हस्ती बँक बँकिंग सेवे सोबतच सामाजिक दायित्वाच्या भावनेने वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असते. यात वृक्षारोपण, सामाजिक संस्थांना आर्थिक मदत यासह दरवर्षी रक्तदान शिबिरा द्वारे गरजू रुग्णांची मदत केली जाते. या सोबतच रक्तदाते व त्यांचे नातेवाईक, मित्र यांना कधीही धुळे किंवा नाशिक येथे रक्ताची गरज भासल्यास त्यांना सवलतीच्या दरात अथवा आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यास विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
रक्तदानाच्या या अमूल्य कार्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला शिबीर आयोजकां तर्फे स्नेह भेट व प्रशस्ति पत्र प्रदान करण्यात येणार आहे. विशेषतः आपल्या रक्तदानामुळे आपण कुणाचे तरी जीवन, प्राण वाचवू शकतो. रक्तदान हे महान दान असते.
तरी नागरिकांनी बहुसंख्येने शिबीरात रक्तदान करावे, अशी विनंती हस्ती बँक प्रेसिडेंट कैलास जैन, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया साहेब, सरव्यवस्थापक माधव बोधवाणी साहेब आणि लायन्स क्लब अध्यक्ष ला. चोईथ कुकरेजा, सचिव ला. संजय सोनार, कोषाध्यक्ष ला. संजय दुग्गड, प्रोजेक्ट चेअरमन ला. दिनेश वोरा, ला. संजय अग्रवाल यांचे तर्फे करण्यात आली आहे. सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अनिल मराठे, आय.टी. असि. जनरल मॅनेजर सुनिल गर्गे, तसेच लायन्स क्लब परिवार परिश्रम घेत आहेत.