महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेज लसीकरण मोहीम संपन्न
चोपडा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंध लस शिबिराचे यशस्वी आयोजन
चोपडा (विश्वास वाडे) संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोविड विषाणू पासून सुरक्षित राहण्यासाठी शासन स्तरावर जनजागृती तसेच कोविड प्रतिबंधात्मक लस देणे सुरू असून खबरदारीचा उपाय म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग व कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय चोपडा येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिन लसींच्या मात्रा देणारे शिबीर नगर पालिका रुग्णालय चोपडा तर्फे दि. ८/१/२०२२ शनिवारी रोजी सकाळी ९:३० ते १:०० यावेळेत आयोजित करण्यात आले.
नगर पालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला यांनी शिबिराचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या करुणा चंदनशिव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी.एस.हळपे,प्रा.विलास दारूंटे, प्रा.एस.टी.शिंदे, प्रा.संदिप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात नगर पालिका रुग्णालयाचे कर्मचारी रंजना निकुंज, सुनिता पावरा आणि सचिन शिंदे यांनी दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना लसींच्या मात्रा दिल्या.
या शिबिराच्या यशस्वीतेकरीता नर्सिंग महाविद्यालयातील तेजस पावरा, नेहा चंदनशिव, तबरेज हारून, राहुल पाटील तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.अनिता सांगोरे, प्रा.संदिप देवरे, प्रा.दिपक करंकाळ, प्रा.सैरभ जैन,प्रा.गायत्री देशमुख, जगन पाटील आदींनी परिश्रम घेतले.