चर्मकार समाजाच्या माठे फाऊंडेशन च्या राज्यस्तरीय वधु वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन
अकोला : दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा चर्मकार समाजाचे आतापर्यंत 106 लग्न जुळलेल्या माठे फाऊंडेशन च्या राज्यस्तरीय वधु वर परिचय पुस्तिका ऋणानुबंध 3 चे प्रकाशन दि 25 नोव्हेंबर गुरुवार ला संत रविदास महाराज सांस्कृतिक सभागृह, सर्वोदय कॉलनी, अमरावती येथे सकाळी 9.30 मिनिटांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे कुलगुरू आदरणीय डॉ दिलीप मालखेडे यांच्या हस्ते आयोजित केले आहे,ज्या ज्या समाजबांधवांनी आपल्या मुलं मुली यांचे साठी वधु वर शोधण्याच्या हेतून बायोडेटा प्रकाशनासाठी दिले आहेत, त्यांना प्रकाशना नंतर तेथेच त्यांच्या ऋणानुबंध 3 ची कॉपी मिळेल , आणि ज्यांना उपस्थित राहणे शक्य नाही त्यांना रजिस्टर पार्सल ने पुस्तक पाठवले जाईल
याच प्रकाशन सोहळ्यामध्ये आतापर्यंत 106 लग्न जुळलेल्या पैकी 100 व्या जोडपे प्रकाश चांगोले, नागपूर यांचे चि.वैभव आणि अजाबराव वासनकर, होशंगाबाद(एम पी), यांची कन्या रेणूताई यांचे व 104 वे लग्न लक्ष्मणराव मारोती इंगळे साई नगर, अमरावती यांचे चंद्रकांत आणि विजयराव देवराव धुमाळे, वाशिम यांची कन्या डॉ.प्रगतीताई यां दोन्ही नवं वर वधु यांचा सन्मान सुद्धा केला जाणार आहे अशी माहिती माठे फाऊंडेशन चे अध्यक्ष महादेव माठे जळगाव जामोद यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.