एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपात शिवशाही व इतर एसटी सेवा सुरू करण्याच्या निर्णय
धुळे जिल्हा विशेष प्रतिनिधी
धुळे : शासनाच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपास मोडीत काढण्यात साठी खाजगी वाहन चालक , तसेच प्रलंबित असलेल्या प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांच्याद्वारे शिवशाही व इतर बससेवा सुरू करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच धुळे डेपोतील कुठलीही बस सेवा कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पाडण्यासाठी आपल्याद्वारे सुरू करण्यात येऊ नये ही मनसेच्यावतीने मागणी करण्यात आली . आपल्या द्वारे शासन दरबारी संपकरी कर्मचार्यांच्या व आमच्या भावना कळवाव्यात. तसेच सदर बस सेवा सुरू करत असताना कायदा व सुव्यवस्थेत काही बिघाड झाल्यास यास महाराष्ट्र शासनच जबाबदार राहील, याची शासनाने नोंद घ्यावी असे सांगण्यात आले .
मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार , एसटी बस सेवा धुळे डेपो येथून संप पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत सुरू करू नये यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक यांना निवेदन दिले व मनसेचा यास विरोध नोंदविला. यावेळी जिल्हा सचिव संदीप जडे ,धुळे तालुका अध्यक्ष संतोष मिस्तरी, धुळे शहर उपाध्यक्ष निलेश गुरव, हर्षल पाटील , मनविसेचे जिल्हा सचिव गौरव गीते, शहराध्यक्ष हर्षल परदेशी उपस्थित होते. सदर आंदोलन करत असताना धुळे तालुका अध्यक्ष संतोष मिस्तरी व हर्षल परदेशी यांना अटक करून स्थानबद्ध करण्यात आले आहे.