प्रल्हाद बी.वाघ यांची भारतीय सैन्यत कॅप्टनपदी नियुक्ती
पारोळा (जितेंद्र कोळी) तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी व मागील ३० वर्षांपासुन भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले सुभेदार मेजर प्रल्हाद बी. वाघ यांची २६ जनवरी गणतंत्र दिवस या रोजी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परवाणगीने व भारतीय सैन्यदलाचे पुणे खडकी येथील ब्रिगेडीयर सेंटर कमांडर यांचा शुभहस्ते नुकतीच प्रल्हाद वाघ यांना भारतीय सैन्यदलात ऑफिसर रँकमध्ये कॅप्टन या पदासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली.
या प्रसंगी कॅप्टन प्रल्हाद बी. वाघ यांचे पालकमंत्री डॉ. सतिष पाटील, भारतीय आदिवासी कोळी सेनेचे प्रदेश अध्यक्ष – जितेंद्र कोळी, सरपंच हिरामण पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील, मनोहर लिंगायत, देविदास वाघ, रामकृष्ण वाघ, राजेंद्र पवार, सतिष पवार, गोविंदा वाघ, प्रशांत नावरकर, दिलीप बिरारी, डॉ. सुनील मोरे, रामदास पाटील, महेंद्र पाटील, एस. के. पाटील, अनिल कोळी, बाळकृष्ण बिरारी, कैलास बिरारी, दिलीप जाधव, रोहिदास लिंगायत, मनोहर भामरे, बापू पाटील आदी लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.