बारामती ऍग्रो संचालित चोपडा सहकारी कारखानाचे सुनंदाताई पवार यांच्या हस्ते विधिवत नवचंडी महायज्ञ करून गव्हाण पूजन सम्पन्न
चोपडा : विश्वास वाडे तालुका प्रतिनिधी
चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील सहकारी साखर कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो ला भाडेतत्वावर देणे ची निविदा मंजूर झाले असल्याने गेल्या दीड ते दोन महिन्यापासून कारखान्याचे अंतर्गत मशनरी चे दुरुस्तीचे आणि सर्व्हिसिंग चे व छताचा सर्व पत्रा बदलण्याचे व परिसरात साफसफाई चे कामे करण्यात आले आहेत.
मागील महिन्यात आमदार रोहित पवार आल्याने त्यांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ऊस गाळपास शुभारंभ होईल असे जाहीर केले होते, परंतु मशनरी ला दुरुस्तीसाठी आणि सर्विसिंग साठी उशीर झाल्याने कारखाना परिसरात साखरेचे पोते भरले जातात त्या भागात तीन दिवसापासून नवचंडी महायज्ञ करून दिनांक 21 रोजी बारामती अॅग्रो च्या संचालिका सुनंदाताई पवार यांच्या हस्ते
होम हवन करून गव्हाण पूजन आणि काट्याचे पूजन करण्यात आले
आणि गव्हाणीत उसाची मोळी टाकून ऊस गाळपास शुभारंभ झाला. सदर कार्यक्रम कारखाना परिसरात दिनांक 21 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास संपन्न झाला. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अॅड संदीप पाटील, कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे, व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, बारामती ॲग्रो ची सर्व जबाबदारी सांभाळणारे सुभाष गुळवे मिली चोपडा साखर कारखान्याचे व्यवस्थापक मिलिंद देशमुख, सूनंदाताई पवार यांच्या मैत्रीण सविताताई व्होरा, दीपिका देशमुख, संचालक निलेश पाटील, प्रदीप पाटील अनिल पाटील, गोकुळ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील, शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक श्री एस. बी. पाटील, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक अकबर पिंजारी, प्रवीण गुजराथी, आनंदराव रायसिंग, तुळशीराम पाटील, विजय दत्तात्रय पाटील, दिनकर देशमुख, ललित बागुल, विकास शिर्के यांचेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कारखाना परिसरातील ज्या त्या विभागातील एक एक असे 21 कर्मचाऱ्यांना सपत्निक त्या विभागाच्या मशनरी चे पूजन करून कारखाना शुभारंभ झाला. कारखान्याच्या गव्हानित प्रत्यक्ष दि. 21 रोजी ऊसाची मोळी टाकली गेली तरी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी अजून मशनरी दुरुस्तीसाठी व इतर कामांसाठी लागणार असल्याने पंधरा दिवसानं खऱ्या अर्थाने साखर कारखान्यात नियमित गाळपकरेल असे यावेळी सुनंदाताई पवार यांनी प्रसार मध्यमांस बोलताना सांगितले.
गव्हाण पूजनाचा मान शेतकरी म्हणून गणपुर येथील कुलदीप पाटील आणि भाग्यश्री पाटील यांना देण्यात आला. सुनंदाताई पवार यांच्या हस्ते गव्हाण पूजनाच्या आधी त्यांचा सत्कार करण्यात आला. नवचंडी महायज्ञ साठी व इतर सर्व विधी साठी बारामती येथूनच पुरोहित आणण्यात आले होते. सर्व साहित्य बारामती येथून आणण्यात आले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र साखर कारखान्याच्या प्रत्यक्ष मोळी टाकून गाळपास शुभारंभ होण्याच्या कार्यक्रमास खऱ्या अर्थाने मालक असलेले शेतकरी सभासद यांना कळवले गेले नाही. नेहमी शेतकरी सभासदांना घरपोच पत्रिका देऊन गाळपास शुभारंभ होत असल्याचे कळविले जात असे मात्र यावेळी सभासद शेतकऱ्यांना कळविले नाही. त्यामुळे सभासदांची संख्या अत्यल्प दिसली.
गव्हाण पूजन कार्यक्रमाच्या आधी चेअरमन अतुल ठाकरे यांनी प्रास्ताविक केले अरुण भाई गुजराती यांनीही बारामती येथील पवार परिवार आणि चोपडा चे अतूट नाते असल्याने रोहित पवार यांनी हा कारखाना चालवण्यास घेतल्याने त्यांचे जाहीर आभार मानले व शेतकऱ्यांचे ऊसाचे आणि कामगारांचे देणे असलेले पैसे लवकरात लवकर देण्याची विनंतीही त्यांनी सुनंदाताई पवार यांच्याकडे केली.