शिंदखेडा तालुक्यात आदिवासी एकता परिषदेचे आरावे, जोगशेलु, अलाणे या गावात शाखा फलक अनावरण
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील अलाणे, आरावे, जोगशेलु हया गावात वीर एकलव्य जयंती चे अवचित साधुन आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आयोजित शाखा फलक अनावरण पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठया जल्लोषात संपन्न झाले.
त्यात 1) जोगशेलु शाखाप्रमुख -सागर पवार, उपशाखा प्रमुख -अतुल पवार प्रमुख पाहुणे उपसरपंच नाना मालचे शाखा सदस्य छोटु धनगरे , गणेश पवार, कमलेश मालचे , रुपेश पवार, रावसाहेब ठाकरे, अजय ठाकरे, चुनिलाल पवार, अर्जुन पवार , विशाल मालचे , अशोक पवार, विजय पवार, किसन भिल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाज बांधव उपस्थित होते. 2) आलाणे येथे वीर एकलव्य च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर शाखाफलक अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी शाखाप्रमुख अनिल सोनवणे उपशाखा प्रमुख दिपक सोनवणे यासह सदस्य व समाज बांधव . ग्रामस्थ उपस्थित होते. 3)आरावे येथे सुरुवातीस वीर एकलव्य च्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जल्लोषात आदिवासी एकता परिषदेच्या शाखेचे फलक अनावरण करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख रवि ठाकरे, उपशाखाप्रमुख वासुदेव ठाकरे, प्रमुख पाहुणे ग्रा.पं.सदस्य दाजु भिल यासह सदस्य व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. सदर तीनही गावातील शाखा फलक अनावरण प्रसंगी आदिवासी एकता परिषद शिंदखेडा तालुका सचिव गुलाब सोनवणे, उपसचिव भूपेंद्र देवरे, कार्याध्यक्ष दिपक फुले, खजिनदार विकास देवरे, सल्लागार आप्पा सोनवणे, शानाभाऊ सोनवणे संपर्क प्रमुख सुरेश मालचे सदस्य शंकर मोरे, संजय महाले, कैलास मोरे, एकनाथ भिल, कैलास मालचे, ज्येष्ठ कार्यकर्ते जिभाऊ फुले, सुरेश सोनवणे यासह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आदिवासी एकता परिषद ही गावापासून तर संपूर्ण देशासह जगात पसरलेली संघटना आहे. ही एक चळवळ व विचारधारा आहे.
या परिषद मार्फत संघटन मजबूत करून समाजातील विविध समस्या, अडीअडचणी, योजनाविषयी आपली मागणी शाखाप्रमुख यांच्या कडे देवून तालुका स्तरावर परिषदेचे पदाधिकारी निराकरण करतील. तसेच परिषद मोफत शिधापत्रिका व जातीचा दाखला तयार करून समाजापर्यत पोहचविण्याचे विधायक कार्य करीत आहेत. असे तालुका सचिव गुलाब सोनवणे यांनी सांगितले.