शिंदखेडा येथील आदिवासी एकता परिषदेच्या वतीने वीर एकलव्य जयंती साजरी
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील आदिवासी अभ्यासमाला केंद्र या एकलव्य नगरात आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका सचिव गुलाब सोनवणे यांनी केले. तसेच आप्पा सोनवणे, उपसचिव भुपेंद्र देवरे, सुरेश सोनवणे, एकनाथ भिल, सुरेश मालचे, जिभाऊ फुले, दिपक फुले यांच्या सह अनेक मान्यवरांनी पुजन केले.
या जयंतीचे औचित्य साधत तालुक्यातील आरावे, अलाणे, चौगाव या गावात आदिवासी एकता परिषदेचे शाखा फलक अनावरण करण्यात आले. मोठया उत्साहात वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुका सचिव गुलाब सोनवणे यांनी सांगितले की, आदिवासी एकता परिषद गावापुरती मर्यादित संघटना नसुन हे जाळे देशासह जगभरात विविध शाखेच्या माध्यमातून पसरलेले आहे. ही एक चळवळ व विचारधारा आहे. या चळवळीत राहून गद्दारी करीत संघटनेतून बाहेर पडला तो पदाधिकारी वा कार्यकर्ता संपतो.