मुंबई (प्रतिनिधी) आता पीएफ खातेधारकांना दिलासा मिळणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (ईपीएफओ) ऑनलाईन ई-नॉमिनी करण्यासाठीची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 होती परंतु त्यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. मात्र नवीन तारीख अजून निश्चित केलेली नाही, अशी माहिती ईपीएफओने आपल्या ट्विटमधून दिली आहे.
पीएफ खातेधारकांना ईपीएफओच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती उपलब्ध होणार असून आपल्या खात्याला आधार लिंक करता येणार असून याकरीता https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या लिंकवर भेट देता येणार असल्याची माहिती आहे. यूएएन आणि पासवर्डचा वापर करुन खातेधारकांना लॉगइन करता येणार असून त्यानंतर Manage सेक्शनमध्ये केवायसी पर्यायवर जात पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
2019 पासून सुविधा
ईपीएफओने 12 सप्टेंबर 2019 पासून एक परिपत्रक काढून ई नॉमिनेशन सुविधा सुरु केली आहे. मेंबर्स सेवा पोर्टलच्या आधारे या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती आहे.
कुटुंबातील सदस्यांची जोडणी करता येणार
ईपीएफ खात्यासाठी निर्धारित कुटुंब सदस्यांचे नॉमिनेट करण्यात येणार आहे. पुरुष सदस्य आपली पत्नी, मुले, आई वडिल यासह अन्य सदस्यांची जोडणी करता येणार असल्याची माहिती आहे.