स्व.विठ्ठलकाका चतुरस्त्र व्यक्तीमत्व, शहरात त्यांचा दरारा : प्रा. अरुणभाई गुजराथी
चोपडा (विश्वास वाडे) स्व. विठ्ठलकाका व्यक्ती नव्हे तर शक्ती होती.चतुरस्त्र व्यक्तीमत्व होते. प्रखर हिंदू निष्ठा असली तर सामजस्य समज असल्याने सर्व समाजात लोकप्रिय व्यक्ती होते. कोणत्याही धार्मिक सभा, समारंभ, मिरवणूक यांच्यात त्यांचे कायम अस्ततित्व नेहमीच राहिले आहे. रथोत्सव व वहनोत्सवाची परंपरा त्यांचेमुळे जोपासली गेली. गत पन्नास वर्षांपासून ते शहरावर पालक म्हणून जगत होते. त्यांचे जीवन एक उत्सव होता.दुःखात आनंद घेणारा हा माणूस होते. त्यांचा दरारा या शहरात होता, पण सामाजिक जाणीव ठेवून शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता त्यांच्यात होती.त्यांचे गुण घेवून समाजसेवा करु या असे प्रतिपादन माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी येथे केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते, चोपडा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, चोपडा कसबे सोसायटीचे माजी चेअरमन, रेडक्रॅास व चोपडा पीपल्स बॅंकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलदास छगनलाल गुजराथी तथा विठ्ठलकाका यांना श्रध्दांजली सभा डॅा.हेडगेवार चौकात पार पडली.
स्वानंद झारे संघ स्वयंसेवक म्हणून जीवन ते जगले हे जिल्ह्यात आदर्श कार्यकर्ता म्हणून जगले. परमवैभवाला नेणार, सर्वाना सोबत नेणारा विचार विठ्ठलकाकांनी मांडला. संघाच्या ग्राहक पंचायत, किसान संघ, विश्व हिंदु परिषद, वनवासी कल्याण आश्रम यांचे कार्य त्यांनी थके पर्यंत केले. संघाच्या विपरित परिस्थितीत त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेवून चोपडा तालुक्यात संघ विचार घरोघर पोहचविण्याचा वसा घेवून काम केले. असा विचार देवगिरी प्रांताचे संपर्क प्रमुख स्वानंद झारे यांनी व्यक्त केले.
अॅड.संदीप पाटील समर्पित जीवनाचे मुर्तीमंत उदाहरण विठ्ठलकाका होते.रा.स्व.संघाचा विचार त्यांनी आपल्या आयुष्यात राखून ठेवले आहे. सहकार, शिक्षण, समाजिक स्तरात त्यांनी काम केले. चोपडा शहरातील सण, उत्सव पार पाडण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असल्याच्या भावना महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी जेष्ठ नागरिक संघातर्फे व्ही.एच.करोडपती, ह.भ.प.विठ्ठल बोरसे, उर्दू विभागाचे एजाज, महिला मंडळाचे मुख्याध्यापक एस.डी.चौधरी, ग्राहक पंचायतीचे ए.के.बोहरी, चोपडा कसबे सोसायटीचे श्रीकांत नेवे, नगर वाचन मंदिराचे गोविंद गुजराथी, अमर संस्थेतर्फे संजय जोशी, नगरसेवक डॅा.रवींद्र पाटील, नगर परिषदेचे माजी गट नेते जीवन चौधरी, माजी जि.प.अध्यक्ष गोरखतात्या पाटील, गुजराथी समाजातर्फे प्रा.श्यामभाई गुजराथी, चोपडे शिक्षण मंडळातर्फे माधुरी मयूर, भाजपचे माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील,रा.स्व.संघ विभागीय संघचालक राजेश पाटील, देवगिरी प्रांत संपर्क प्रमुख स्वानंद झारे,माजी चोसाका चेअरमन अॅड.घनःश्याम पाटील,भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा छायाबेन गुजराथी, पीपल्स बॅक चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी स्व.विठ्ठलदास गुजराथी यांना श्रध्दांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविंद गुजराथी यांनी केले. याप्रसंगी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, माजी पंस सभापती आत्माराम म्हाळके, औद्योगिक वसाहत चेअरमन राजू शर्मा, संजय कानडे, अॅड.रवींद्र जैन, राजेंद्र पाटील, तालुका संघचालक डॅा.मनोज साळूंखे, नंदकिशोर पाटील, हितेंद्र देशमुख, कृउबा सभापती दिनकरराव देशमुख, सुनिल जैन यांचेसह पदाधिकारी, नागरिक, महिला, पुरुष उपस्थित होते. स्व.विठ्ठलदास गुजराथी यांचे उपस्थितांनी प्रतिमेला पुष्पे अर्पण केली. याप्रसंगी अवधूत ढबू यांनी संघ पद्य सादर केली.