भारतीय जनता पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने सोयगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चक्काजाम आंदोलन
सोयगाव : ( विवेक महाजन तालुका प्रतिनिधी)
सोयगाव : महावितरण कडून शेतकऱ्यांना वीज वसुली साठी होणारी अडवणूक ,विज कनेक्शन कपात करणे थांबवावे,जळालेले रोहित्र तात्काळ उपलब्ध करून द्यावे या मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने सोयगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य पुष्पा ताई काळे, मा. नगराध्यक्ष कैलास काळे,प.स.सदस्य संजीवन सोनवणे,शहराध्यक्ष सुनिल ठोंबरे,जिल्हा चिटणीस वसंत बनकर, मा.नगरसेवक राजेंद्र जावळे, योगेश मानकर ,संजय मोरे,मयुर मनगटे,कादिर शहा,बाळू शेठ झवर, राहुल परदेशी,नानाभाऊ जाधव ,विनोद मिसाळ अनिल चौधरी, योगेश पाटील,दिलीप पाटील, मधुकर पाटील ,वंदनाताई पाटील, भीमा चव्हाण ,रामदास पाटील, भाऊराव पाटील ,ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश पवार ,शेनपडु सावळे, महेश मानकर ,योगेश कळवत्रे, संदीप सुरडकर, रघुनाथ वसंत पाटील,अनिल मोरे व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बंधू उपस्थित होते