महाराष्ट्र
सटवाई देवीचा चौथा वर्धापन दिन साजरा
नांदेड (प्रतिनिधी) सटवाई देवीचा चौथा वर्धापन दिन खपराळा येथे दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो. याहीवर्षी महाराष्ट्र आणि तेलंगणा सेमी अंतर्गत प्रसिद्ध असलेल्या सटवाई माता जागृत देवस्थान खपराळा येथे चौथा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम सोहळा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. मीनलताई खतगावकर, जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पाहुणे केदार पाटील साळुके, संदीप पाटील कवळे, बालाजी पा शिंदे, युवा सेना जिल्हाध्यक्ष तसेच गुरुवर्य रुद्र गिरी महाराज किवळेकर, लक्ष्मण ठक्करवाड जिल्हा परिषद सदस्य, संभाजी शेळके पंचायत समिती, दिलीप खंडेराय राष्ट्रीय कलावंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मणराव बोगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार अवधूत कदम यांनी मानले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.