महाराष्ट्र
मनुमाता मंदिरात सोनवणे परिवाराचा नवसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) भाविकांचे श्रद्धेचे स्थान असलेले मनुमाता मंदिर दरवर्षी मराठी महिन्याच्या चैत्र महिन्यात अष्टमीला नवसाचा कार्यक्रम मौजे हिंगोना तालुका चोपडा येथील सोनवणे परिवाराचा नवसाचा कार्यक्रम यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा झाला असून तीन मुलांचा व चार मुलींचा मानतेचा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झाला.
शेकडो वर्षांची परंपरा असलेला मनू मातेचा कार्यक्रम हा दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात साजरा होत असला तरी मागील दोन वर्षात कोरोना काळात हा कार्यक्रम निर्बंधांमुळेबंद झाला होता. यावर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला असून हजारो भाविकांनी मनु मातेचे दर्शन घेतले.