सिल्लोड येथे 26 / 11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहण्यात आली आदरांजली
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.26, सिल्लोड येथे मुंबई येथील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली . शिवसेना – युवासेनेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, डॉ. संजय जामकर, युवासेना जिल्हाध्यक्ष कैलास जाधव, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, नामदेव उबाळे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ,शंकरराव खांडवे, मतीन देशमुख, सुधाकर पाटील, मनोज झंवर, प्रशांत क्षीरसागर, सत्तार हुसेन, राजू गौर, अन्वी सरपंच डॉ. दत्ता भवर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, कुणाल सहारे, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, शिवसेना महिला आघाडीच्या वर्षा पारखे, ज्योती सुरडकर, अल्काबाई बोराडे, दीपक अग्रवाल, फहिम पठाण, मानसिंग राजपूत, उपतालुकाप्रमुख रवी रासने, कैलास इंगे, आशिष कुलकर्णी, रवी गायकवाड, शिवसेना व्यापारी आघाडीचे अमृत पटेल, आनंद सिरसाट, योगेश शिंदे, सागर काळे, सनी कटारिया, हाजी राजू देशमुख, अजिनाथ गवारे, दीपक बिरारे, भगवान बगळे, गणेश घुलेवाड आदींसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.