सोयगाव : शहरातील सोयगाव तालुका सह फळे व भाजीपाला विक्री संस्था मर्या.सोयगाव यांच्या तर्फे देण्यात आलेले गाळेधारकांना कोरोना-१९ काळातील पहिला टप्पा व दुसरा टप्पा दुकाने बंद असून सुद्धा गाळधारकांनी कोरोना -१९ दोन्ही टप्प्यातील बंद काळातील राहिलेले भाडे नियमानुसार भरून भरणा केला म्हणून सोयगाव तालुका फळे व भाजीपाला विक्री संस्था सोयगाव तर्फे दि.२३ मंगळवार रोजी संस्थेच्या कार्यालयात गाळधारकांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन देविदास राजपूत,व्हाॅ.चेअरमन दत्तू मिसाळ,संस्थेचे व्यवस्थापक कृष्णा शेवाळकर, व संस्थेचे संचालक देविदास पदमे,विठ्ठल पाटील,जगन्नाथ दुतोंडे,गोकूळ रोकडे,राजेंद्र जावळे,हरिभाऊ पाटील,म.ईरफान कादरी,यांच्यातर्फे गाळधारकांचे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले ते पुढीलप्रमाणे गाळधारक नरेंद्र कंधारे, संजय मिसाळ,त्र्यंबक पवार,योगेश दुसाने,रामदास राजपूत,विष्णू राजपूत,चेतनकुमार पाटील,वासुदेव खेडकर,डाॅ.दिनकर पिंगळाकर,राजेंद्र भामरे यांना सन्मानपत्र देण्यात आले.