महाराष्ट्र

विजमंडळाचे खाजगीकरण करायचा डाव : एस बी नाना पाटील.

विजमंडळाचे खाजगीकरण करायचा डाव शेतकऱ्यांचे नावावर खपवनेसाठी…दर तीन महिन्यांनी खोटी बिले देवून विजचोर ठरवणाऱ्या मंत्री असो की अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे,शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र होणार….एस बी नाना पाटील.
……देशात दिल्ली सारख्या दाट लोकवस्तीच्या राज्यात देखील एका आठवड्यात वीज चोऱ्या रोखून वीजबिल निम्म्यावर आणले गेले ते गेल्या कित्येक वर्षापासून तेथे सुरू आहे.म्हणजे आपल्याच देशात स्वस्तात वीज देता येते याचे उत्कृष्ट मॉडेल आहे.तसेच देशभर अनेक विकसित/अविकसित साऱ्या राज्यात अश्वशक्ती वर आधारित वीजबिल शेतकऱ्यांना दिली जात आहेत.जगभर रात्रीची वीज तर घरात देखील स्वस्त असते.
पण महाराष्ट्रात गेल्या दशकापासून कोणाच्याही शेतात विज मीटर नाही,पण शेतीपंपाच्या त्या फिडर वरून दिलेली सारी वीज चोरी शेतकऱ्यांच्या माथी मारून खोटी वीजबिल देवून त्यांना एकतर विजचोर किंवा पैसे बुडवनारे ठरवले जात आहे.सबब सारे त्याला लुटत असताना पुन्हा त्याच्यावर अन्याय केला जात आहे.
दर तीन महिन्यांनी वारंवार शेतकऱ्यांकडे हजारो कोटींची थकबाकी त्यामुळे विजमंडळ तोट्यात चालू आहे अशी ओरड करण्यामागे वीज मंडळ खाजगीकरणा डाव दिसत आहे.परंतु त्यासाठी जगाचा पोशिंदा शेतकरी बदनाम केला जात आहे.
दरवर्षी साधारणपणे दहा ते पंधरा हजार रुपये भरून देखील त्याच्यावर शेतीची किंमत नाही तेवढी थकबाकी दाखवली जात असेल तर तो आत्महत्या नाही करणार तर काय करणार.
निव्वळ शेतकरी राजाच्या इज्जतीसाठी आज चोपडा येथे रास्ता रोको करण्यात आला आहे असेही या वेळी म्हणाले…पण साऱ्या चोरांनी चोरलेली वीज चे बिल शेतकऱ्यांचे नावावर टाकून वसूल करण्याचे आदेश ज्यांनी दिले ते मंत्री असोत की अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली व तसे निवेदन शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अवतारसिंह चव्हाण यांना देण्यात आले.
माजी आमदार दिलीप सोनवणे यांनी शेतकऱ्यांची रास्त मागणी असताना देखील न्याय मिळत नसेल तर आम्ही आपल्या भावना वरिष्ठांना कलवणार असल्याचे सांगितले.
शिवव्याख्याते संजीव सोनवणे यांनी चौफेर हल्ला चढवत सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांना लुटत असल्याचे सांगितले.आताचे मंत्री विरोधी पक्षात असताना जे बोलायचे त्याच्या क्लिप त्यांना ऐकवा व आठवण करून द्या असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला.
आंदोलक शेतकऱ्यांशी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी देखील चर्चा करून अधिकाऱ्यांशी चर्चा करून परवा यातून मार्ग काढू असे आश्वासन देखील त्यांनी दिले,त्या संदर्भात चर्चा करणेसाठी मंगळवारी दुपारी १२वाजता विश्रामगृह चोपडा येथे बैठक ठेवली असल्याचे सांगितले.
एस बी पाटील,घनश्यामभाई अग्रवाल,घनश्याम अण्णा पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली व परवा अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगितले,तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास,न भूतो न भविष्य ती असे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
या वेळी एस बी पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे,गोरख तात्या पाटील,सी एस पाटील,धनंजय पाटील,नारायण पाटील,विकास शिर्के,विनोद चव्हाण,पुरुषोत्तम पाटील,धर्मराज पाटील,विश्वनाथ पाटील,मधुकर पाटील,भागवत महाजन,संतोष पाटील,अजित पाटील,चंद्रशेखर वाघ,अरविंद पाटील,राजेंद्र पाटील,अरविंद बिऱ्हाड,राजेंद्र पाटील,संदीप पाटील,संजय पाटील,समाधान पाटील,योगेश महाजन,मधुकर पाटील,प्रमोद पाटील,दिनेश वाघ,संदीप बोरसे,माधवराव पाटील,युवराज पाटील,दीपक पाटील,दिलीप सोनवणे,विकास पाटील,संजीव सोनवणे,दिलीप पाटील,मोहन पाटील,अनिल पाटील,पाटील यांचेसह शेकडो शेतकरी हजर होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे