महाराष्ट्र

भारतीय संविधानामुळेच मिळाला समानतेचा अधिकार : प्रा.लिलाधर पाटील

चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिवसानिमित्त ‘भारतीय संविधान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. याप्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे तर प्रमुख वक्ते म्हणून धनदाई महाविद्यालय, अमळनेरचे प्रा.लिलाधर पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे परिचय व प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री.डी.डी.कर्दपवार यांनी केले. तर उद्देशपत्रिकचे वाचन श्री.बी.एच.देवरे यांनी केले. यावेळी २६/११ रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या व्याख्यानप्रसंगी प्रा.लिलाधर पाटील यांनी ‘संविधान’ या विषयावर बोलतांना ‘संविधान सभेतील विविध प्रसंग सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान त्याचबरोबर संविधानामुळेच भारतीय समाजातील श्रेष्ठ – कनिष्ठ, श्रीमंत – गरीब असा सामाजिक, आर्थिक व राजकीय भेदभाव संपुष्टात आले असून सर्व नागरिकांना समान अधिकार प्राप्त झालेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थिनींची संख्या हे संविधानाचीच देन आहे असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.’तो
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे म्हणाले की, ‘संविधानिक साक्षरता निर्माण होणे आवश्यक असून प्रत्येकाने किमान एकदा तरी संविधान अभ्यासून इतरांना देखील संविधानिक साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.’
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.कविता बोरसे हिने केले. तर आभार श्री.व्ही.बी.पाटील यांनी मानले.
यावेळी सौ.मायाताई शिंदे, श्री.डी.पी.सपकाळे, सौ. क्रांती क्षिरसागर, श्री.ए.बी.सूर्यवंशी, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.के.लभाणे, सहा.रा.से.यो. अधिकारी श्री.व्ही.पी. हौसे, डॉ.सी.आर.देवरे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.ए.वाघ, डॉ.आर.आर.पाटील, सौ.एस.बी.पाटील, श्री.संदीप पाटील, श्री.जी.बी.बडगुजर, शाहीन पठाण आदि प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.जयवंत सनेर तसेच राज्यशास्त्र विभाग, रा.से.यो. विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे