चोपडा : तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी बी. निकुंभ माध्य.उच्च माध्य. विद्यालयात शासनाच्या परीपत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जाणीव जागृती व्हावी व संविधानाचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजावे यासाठी ‘माझे संविधान माझा अभिमान’ यावर आधारित विविध उपक्रम घेण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांकडून संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. प्रा. समाधान बिऱ्हाडे यांनी संविधानाचे महत्व सांगितले. या उपक्रमात निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घेण्यात आल्या. यात इयत्ता ५ वी ते १२ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हर्षदिव्या सोनवणे, विद्या करनकाळे, गंगा करनकाळे या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट निबंध, पोस्टर, वक्तृत्व निवडण्यात येऊन फेसबुक वर प्रसारित करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक व्ही.ए.नागपुरे, आर .एम.चौधरी व्ही. पी. पाटील,रुपेश नेवे उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख प्रा. ईश्वर राजपूत,एस आर पाटील यांनी काम पाहिले. संविधान दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रवीलाल पाटील, सचिव जवरीलाल जैन, संचालक मंडळ, मुख्याध्यापक आर. पी .चौधरी,पर्यवेक्षक व्ही.ए. नागपुरे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
Speed News Maharashtra
ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159