महाराष्ट्र

आजचं राशीभविष्य, शुक्रवार ६ मे २०२२ !

मेष:-
जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मध्यस्थीच्या कामातून लाभ होईल. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल.

वृषभ:-
आवक जावक यांचा मेळ जुळवावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. कामात काही अनपेक्षित बदल संभवतात. घरगुती प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे.

मिथुन:-
कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. फसवणुकीपासून सावध रहा. गप्पा गोष्टी करण्यात वेळ घालवाल. अघळ पघळ बोलणे टाळा. इतरांचा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो.

कर्क:-
मानसिक चंचलतेला आवर घालावी. घरासाठी काही मोठ्या वस्तु खरेदी कराल. मानाच्या व्यक्तींची गाठ पडेल. प्रकृतीबाबत हयगय करू नका. उष्णतेचे त्रास संभवतात.

सिंह:-
केलेल्या कामातून समाधान मिळेल. नवीन मित्र जोडाल. खूप दिवसांनी जुने मित्र भेटतील. पत्नीशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. अपचनाचा त्रास जाणवेल.

कन्या:-
कामाची एकाच धांदल उडेल. योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा. कमिशन मधून चांगला लाभ मिळेल. इतरांचा विश्वास संपादन करावा. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.

तूळ:-
अडथळ्यातून मार्ग काढता येईल. दिरंगाई झाले तरी कामे पूर्ण होतील. मित्रांच्या मदतीचा लाभ होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल.

वृश्चिक:-
मनातील निराशा झटकून टाका. सकारात्मक विचारांची कास धरावी. कौटुंबिक गोष्टींमध्ये लक्ष घाला. कामाचा व्याप वाढता राहील. हातातील कामे पूर्ण होतील.

धनू:-
मनातील चुकीचे विचार दूर सारावेत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी सलोखा वाढवावा. खर्चाचे प्रमाण आटोपते ठेवावे. जोडीदाराशी सल्ला मसलत करावी.

मकर:-
कामात आळस आड आणू देऊ नका. जवळचे नातेवाईक भेटतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. हाताखालील लोकांवर बारीक लक्ष ठेवावे. कुणावरही चटकन विश्वास टाकू नका.

कुंभ:-
तब्येतीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्या. गरज नसेल तर प्रवास करू नये. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्यात दिवस खेळीमेळीत जाईल.

मीन:-
सामुदायिक वादापासून दूर राहावे. स्त्री वर्गापासून हानी संभवते. व्यावसायिक लाभाने संतुष्ट राहाल. उत्तम गृह सौख्या लाभेल. मित्रांबाबतचे गैर समज दूर होतील.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे