गुन्हेगारी

बापरे ! मंत्री नितीन राऊतांचा पुतण्या असल्याचं सांगत ११ जणांची फसवणूक

मुंबई : विद्युत विभागात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्यानं लोकांची फसवणूक करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नातेवाईक असल्याचं सांगत या तरुणाने ११ लोकांची फसवणूक केली होती. संदीप राऊत असं आरोपीचं नाव आहे.

आरोपीने स्वतःला महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचं लोकांना सांगितलं होतं. तसेच राऊत आपले काका असून आपण विद्युत विभागात सरकारी नोकरी लावून देऊ, या बहाण्याने आरोपी संदीप राऊतने ११ जणांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबईतील दादर पोलिसांनी संदीप राऊत या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं नाव सांगत या आरोपीने लोकांची फसवणूक केल्याने संताप व्यक्त होत आहे. शिवाय आरोपी संदीपला राऊतला अटक करण्यात आली की नाही, यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे